Soybean Rate दिवाळीपूर्वीच सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना भाव वाढीचे बोळवण.

By Satish Jadhav

Published on:

Soybean Rate  नमस्कार मित्रांनो यंदा राज्यामध्ये बऱ्याच दिवस पावसाने दडी मारल्यामुळे सोयाबीनचे उत्पादन घटले आहे, त्यामुळे शेतकरी अडचणीत सापडला आहे आणि सोयाबीनचे बाजार भाव चांगले राहिले तर शेतकरी अडचणी पासून दूर राहू शकतो, गेल्यावर्षी सरकारने सोयाबीन आयात केल्यामुळे सध्या सोयाबीनला चांगला भाव मिळत नाही.तसेच सर्वच बाजारात सध्या नवीन सोयाबीनची आवक वाढली आहे. विदर्भातील अकोला जिल्ह्यातील अकोला कृषी बाजार समितीत गेल्या चार दिवसांत २२ हजार ५८१ एवढी क्विंटल आवक झाली आहे.

Soybean Rate  सोयाबीनला सरासरी ४ हजार ४०० रुपये प्रतिक्विंटल भाव मिळत आहे. परंतु, किमान आणि कमाल भावात वाढ होत असल्याचे चित्र आहे. कालच्या तुलनेत आज सोमवारी कमाल दरात सुधारणा होत ६० रुपयांनी वाढ झालीय. त्यामुळ दर ४ हजार ८७५ रूपयांपर्यत क्विंटलमागे पोहचले आहे. हंगामाच्या सुरुवातीस बाजारात मिळणारा भाव निराश करणारा होता.मात्र, मागील आठवड्याच्या अखेरपासून सोयाबीनच्या दरात काहीशी वाढ झाली असून, अकोला जिल्ह्यातील सर्वच बाजार समित्यांमधील सोयाबीनच्या दराने हमी भावाची पातळी ओलांडल्याने शेतकऱ्यांना काहीसा दिलासा मिळाला आहे.

 

या चाळीस तालुक्यामध्ये दुष्काळाचे सावट पहा कशी मिळणार हेक्टरी आर्थिक मदत येथे क्लिक करून

Soybean Rate उत्पादन खर्च वाढला आहे. मात्र, त्या तुलनेत शेतकऱ्यांच्या सोयाबीनला अपेक्षेप्रमाणे भाव नाहीये. २०२३-२४ या वर्षात सोयाबीनला ४ हजार ६०० रुपये प्रतिक्विंटल हमीभाव जाहीर केला आहे. यंदा नवीन सोयाबीन बाजारात दाखल झाले असून तेव्हा भाव कमी होता. हा भाव हमी भावापेक्षाही कमीच होता. गेल्या आठवडाभर सोयाबीनच्या भावात घसरण कायम असल्याचे दिसून येत होतंय. मात्र, २१ ऑक्टोबरपासून भावात सुधारणा झाली. अकोल्याच्या बाजारात शनिवारी कमीत कमी ३ हजार ६५० ते जास्तीत जास्त ४ हजार ७८५ रुपये प्रतिक्विंटल भाव सोयाबीनला मिळाला. काल २२ रोजी ३ हजार ३०० ते ४ हजार ८१५ रुपयांपर्यंत भाव मिळाला. भावात सुधारणा होत असल्याने सोमवारपासून बाजार समित्यांमध्ये आवक वाढण्याची शक्यता घाऊक आडते आणि व्यापाऱ्यांनी वर्तवली होती.

वडिलोपार्जित शेत जमीन कशी करणार 100 रुपयात नावावर संपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा

गेल्या चार दिवसांपासून आवक मध्ये वाढ होत असून आज सोमवारी ५ हजार ३७० एवढी क्विंटल सोयाबीन खरेदी झालंय. तर किमान आणि कमाल भावात देखील वाढ झाली आहे. या बाजारात कालच्या तुलनेत कमीत कमी ३ हजार ७५० पासून ४ हजार ८७५ प्रति क्विंटलपर्यत सोयाबीन भाव मिळाला. तर सरासरी भाव ४ हजार ४०० रूपयांपर्यत मिळतो आहे. तरीही शेतकऱ्यांना अपेक्षित प्रमाणे भाव मिळत नसल्याने शेतकरी शेतमाल घरात साठवून ठेवणार असल्याचे चित्र आहे. पुढील काळात भाव वाढतील का असे शेतकऱ्यांची लक्ष भाऊ वाडी कडे लागल्यामुळे या भाववाढीमुळे शेतकऱ्यांना सोयाबीन विकताना परवडत नसल्यामुळे शेतकरी हा अडचणीत सापडला आहे धन्यवाद.

Satish Jadhav

MhShetkari या वेबसाईट द्वारे नव-नवीन शेती विषयी योजनाची तसेच चालू घडामोडीं बद्दल माहिती देत असतो. माहिती कशी वाटते कॉमेंट करून नक्की सांगत जा, तसेच अपडेट राहण्यासाठी आमचा WhatsApp ग्रुप नक्की जॉईन करा.

Related Post

Leave a Comment