Dushkal Anudan Yojana या उर्वरित 178 तालुक्यात दुष्काळ जाहीर पहा यादी

By Satish Jadhav

Published on:

Dhuskal jahir नमस्कार शेतकरी बांधवांसाठी सर्वात मोठी बातमी समोर आलेली आहे. उर्वरित ९५९ मंडळामध्ये या ठिकाणी दुष्काळ स्थिती जाहीर करण्यात आलेली आहे आणि आता एकूण 178 तालुक्यामधील या मंडळांना पात्र करण्यात आलेला आहे. तरी यामध्ये कोणती जिल्हे आहे . कोणत्या जिल्ह्यातील मंडळ यामध्ये पात्र ठरविण्यात आलेली आहे याची सविस्तर माहिती खाली पहा.Dushkal Anudan Yojana

Dhuskal jahir यापुर्वी राज्य सरकारने 40 तालुक्यातील 269 महसूल मंडळात दुष्काळ जाहीर केला होता. आतापर्यंत जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार राज्यात 50% पेक्षा अधिक महसूल मंडळात दुष्काळी परिस्थिती असल्याचे सर्वेक्षणातून समोर आले आहे. राज्यातील एकुण 2068 मंडळात दुष्काळी परिस्थिती असली तरी या महिन्याच्या शेवटी याबाबत निर्णय घेतला जाणार असल्याचे राज्य सरकारकडून कळवले आहे..

Dhuskal jahir  महाराष्ट्र सरकारने आतापर्यंत 1228 महसूल मंडळात दुष्काळ जाहीर केला आहे. राज्य सरकारने 269 महसूल मंडळात दुष्काळ जाहीर केल्यानंतर राज्यभरातून लोकप्रतिनिधी च्या माध्यमातून आपल्या मतदारसंघात दुष्काळ जाहीर करण्याची मागणी केली जात होती.या मागणीनुसार राज्य सरकारने नव्याने 959 महसूल मंडळात दुष्काळ जाहीर केला आहे.

दुष्काळग्रस्तांना या सवलती दिल्या जाणार.Dushkal Anudan Yojana

दुष्काळग्रस्तांना देण्यात येणाऱ्या जमीन महसूलात घट, पीक कर्जाचे पुनर्गठन, शेतीशी निगडित कर्जाच्या वसुलीस स्थगिती, कृषी पंपांच्या वीज बिलात ३३.५ टक्के सूट, शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या शुल्कात माफी, रोहयो अंतर्गत कामाच्या निकषात काही प्रमाणात शिथिलता,आवश्यक तिथे पिण्याचे पाणी पुरवण्यासाठी टँकरचा वापर, टंचाई जाहीर केलेल्या गावात शेतकऱ्यांच्या शेती पंपांची वीज जोडणी खंडित न करणे या सवलती ९५९ महसुली मंडळामध्ये देण्यात येतील.

यादी पाहण्यासाठी येथे क्लिक करा 

Satish Jadhav

MhShetkari या वेबसाईट द्वारे नव-नवीन शेती विषयी योजनाची तसेच चालू घडामोडीं बद्दल माहिती देत असतो. माहिती कशी वाटते कॉमेंट करून नक्की सांगत जा, तसेच अपडेट राहण्यासाठी आमचा WhatsApp ग्रुप नक्की जॉईन करा.

Related Post

Leave a Comment